Thursday, August 20, 2026
HomeSocialराष्ट्रीय चर्मकार परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी लक्ष्मण जाधव यांची निवड

राष्ट्रीय चर्मकार परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी लक्ष्मण जाधव यांची निवड

कोल्हापूर : चर्मकार कल्याण फौंडेशन संलग्न राष्ट्रीय चर्मकार परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शिंगणापूर (ता. करवीर) येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पांडुरंग जाधव यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोकुळ सुबराव कांबळे यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आले.

राष्ट्रीय चर्मकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष दीपक मारुती यादव यांनी जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविल्याचे सांगितले. समाजाचे दैवत संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करण्याचे आवाहन नियुक्तीपत्रातून करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून लक्ष्मण जाधव यांनी राष्ट्रीय चर्मकार परिषदेचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजहिताच्या विविध उपक्रमांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील सामाजिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular